एक लाखाचे कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुणाची 44 हजारांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/cheating.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
एक लाख रुपयांचे कर्ज देतो असे सांगून प्रोसेसिंग फी आणि अन्य प्रकारचे चार्जेस सांगून तरुणाकडून 44 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन तरुणाला कर्ज न देता फसवणूक केली. ही घटना 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी रुपीनगर, तळवडे येथे घडली.
अक्षय विनोद कोकाटे (वय 26, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार [email protected] हा मेल आयडी धारक, 8597844238, 8276957727 क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रुपीनगर येथे काम करत असताना त्यांना [email protected] यावरून एक मेल आला. एव्हरीडे फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून बिजनेस पर्सनल लोन देण्याची आरोपीने जाहिरात पाठवली. फिर्यादी यांनी त्या जाहिरातीवर विश्वास ठेऊन एक लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन करून कर्ज घेण्यासाठी प्रोसेसिंग फी आणि अन्य कारणांसाठी पैसे भरावे लागतील असे सांगून फिर्यादीकडून 44 हजार रुपये घेत फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.