पिंपरी / चिंचवड
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/koyta.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
शस्त्र बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) रात्री साडेअकरा वाजता पिंपळे गुरवकडे जाणा-या रोडच्या कडेला कासारवाडी येथे करण्यात आली.
अर्शद हनीफ सय्यद (वय 21, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी स्वामी नरवडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यात एक लोखंडी कोयता अवैधरित्या बाळगला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी अर्शद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आयुक्तांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश दिले आहेत. आरोपी अर्शद याने या आदेशाचे उल्लंघन केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.