पिंपरी / चिंचवड
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी l प्रतिनिधी
गावठी बनावटीचे पिस्टल बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने ताथवडे येथून एका तरुणाला अटक केली आहे. मंगळवारी (दि. 24) सायंकाळी केलेल्या या कारवाई मध्ये पोलिसांनी एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहेत.
आदिनाथ उर्फ सौरभ संजय पवार (वय 22, रा. ताथवडे) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई मोहसीन युसूफ अत्तार यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिनाथ पवार याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आदिनाथ याच्या घरी छापा मारून कारवाई केली. त्यात एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतुस पोलिसांना आढळले. शस्त्र जप्त करून पोलिसांनी आदिनाथ याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.