ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

पिंपरी चिंचवड | विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 31 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल मॅक्झीनसह व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वा नऊच्या सुमारास भोसरी येथे गुळवे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला करण्यात आली.

शशिकांत हनुमंत बॅगरी (वय 22, रा. आनंद नगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी सुमित देवकर यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे विनापरवाना शस्त्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी कारवाई करून आरोपीला पकडले. त्याच्याकडून 31 हजार 500 रुपये किमतीचे एक पिस्तूल मॅक्झिनसह तीन जिवंत काडतुसे जप्त केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button