चार जणांकडून तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी l प्रतिनिधी
तरुणाच्या जमिनीवरून डंपर आणि हायवाने वाहतूक करणा-यांना तरुणाने विरोध केला. त्यावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी बुर्डे वस्ती, च-होली बुद्रुक येथे घडली.
गणेश ज्ञानेश्वर बुर्डे, संदेश ज्ञानेश्वर बुर्डे, विजय हिरामन बुर्डे, विशाल ज्ञानेश्वर बुर्डे (सर्व रा. बुर्डेवस्ती, च-होली बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नील अशोक बुर्डे (वय 30, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी स्वप्नील यांच्या जमिनीवरून डंपर तसेच हायवाने वाहतूक केली. या वाहतुकीसाठी स्वप्नील यांनी विरोध केला. त्याचा राग मनात धरून आरोपींनी संगणमत करून फिर्यादीकडे गेले. आरोपी गणेश बुर्डे याने हातात कोयता घेऊन फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला कोयता मारला असता तो फिर्यादीने हुकवला. आरोपी विशाल बुर्डे याने फिर्यादीला पाठीत चाकू मारून जखमी केले. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.