breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड गावठाणात ‘योग शिबिर’ संपन्न

पिंपरी – २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या कोरोनाच्या कठीण काळात चिंचवडकर नागरिकांच्या निरोगी व सुखी जीवनाकरिता पतंजली योग समिती व भारतीय जनता पार्टी चिंचवड गावठाण यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावातील ‘गोखले हाॅल’ येथे शासनाच्या सोशल डिस्टंसच्या सर्व नियंमांचे पालन करीत निवडक योग साधकांच्या उपस्थितीत ‘फेसबुक लाईव्ह योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

योगगुरू व पतंजली योग समितीचे डाॅ.अजित जगताप यांच्या हस्ते भारत मातेच्या पुजन करून योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी या शिबिराचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस व नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे, सहआयोजक भाजपा चिंचवड किवळे मंडलाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, भाजपा शहर उपाध्यक्ष पाटीलबुवा चिंचवडे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य अजित कुलथे, सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय शाळिग्राम, सोशल मिडिया सेलचे शहराअध्यक्ष अमेय देशपांडे, सोशल मिडिया सेलचे मंडलाध्यक्ष किरण वाल्हेकर, राहुल मोकाशी, अाशुतोष गोखले आदी प्रमुख मान्यवर व योगसाधक उपस्थित होते.
तासभर चाललेल्या या शिबिरात योगगुरू डाॅ. अजित जगताप यांनी विविध आसने व प्राणायम योग करून दाखविले व तसेच कोरोनाच्या काळात योगासन व प्राणायम यांचे महत्व याबाबत मौलिक असे महत्वाचे मार्गदर्शन देखिल केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button