breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘योगासनामुळे आरोग्याबरोबरच मिळते मन:शांती’; अश्विनी जगताप

पिंपरी : योगाचे एक वैशिष्ट असे आहे की, तुम्ही युवक असा की वयोवृध्द, निरोगी असा की आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. योगासनामुळे आरोग्याबरोबरच मिळते मन:शांती मिळते, असे मत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोहम योग साधना, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, पवना ग्रुप आणि माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावातील देऊळमळा पटांगणात आयोजित केलेल्या योगामध्ये आमदार जगताप यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सोहम योग साधनाचे दिगंबर उचगांवकर, अनुजा उचगावकर, अश्विनी चिंचवडे, अॅड. सतिश गोरडे, उद्योजक रवी नामदे, नितीन बारणे, दुर्गेश देशमुख सहभागी झाले होते. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने झालेल्या या योगामध्ये सुमारे 800 जणांनी सहभाग घेतला.

लोकनेते लक्ष्मण जगताप यांचे योगावर प्रचंड प्रेम होते. नित्यनियमाने ते दररोज योगा करत होते अशी आठवण सांगत आमदार जगताप म्हणाल्या, योगामुळे वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत तसेच प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य होते. यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो. सुरुवातीस योगासने करणे जड जाते. हळूहळू सरावाने आणि शरीर लवचीक झाल्याने ही अवघड दिसणारी आसने स्थिर व तणावमुक्त (सुखाची) होऊ लागतात.

दिगंबर उचगांवकर, अनुजा उचगावकर यांनी योगाचे धडे दिले. सुर्यनमस्कार, शयन स्थिती आसने, सेतू बंधासन, पवन भुक्तासन, शवासन, भुजांगसन, शलआसन, मकरासन, भद्रासन, शशांकासन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोआसन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोनम अशी विविध आसने करण्यात आले. यात 800 जणांनी सहभाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button