स्त्रीशक्तीचा जागर अन् मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा!
झांज, ढोल, आणि मर्दानी खेळांनी महिला शोभायात्रा : हिंदूत्त्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
मोशी येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शोभा यात्रेचे प्रतिनिधित्व महिला करणार आहेत. या निमित्ताने महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक, शोभायात्रेत सहभागी होणार असून मर्दानी खेळांचे देखील महिला सादरीकरण करणार आहेत.
भाजपाचे प्रखर हिंदूत्वववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ही शोभायात्रा होत आहे. उद्या रविवारी (दि.३०) मोशी येथील वूड्स विले सोसायटी पासून सकाळी ७ वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शिवरस्ता ते स्वराज रेसिडेन्सी चौक या मार्गाने शोभायात्रा मार्गस्थ होईल. शोभा यात्रेमध्ये महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक तसेच महिलांचा मर्दानी खेळ मुख्य आकर्षण असणार आहे.
हेही वाचा : ‘ईपीएस’ धारकांना नऊ हजार रुपये पेन्शन द्या; खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी
गुढीपाडव्याच्या निमित्ताने वेशभूषा स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे. आलेल्या प्रत्येक महिला- पुरुषांसाठी फेटे आणि लहान मुलांच्या विविध वेशभूषा शोभा यात्रेमध्ये परिधान केले जाणार आहे. दरम्यान, शोभा यात्रेच्या निमित्ताने वेशभूषा या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक लहान मुला-मुलीस आकर्षक बक्षीस देखील देण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
नववर्षाच्या स्वागताबरोबरच आपल्या परंपरांना समोर ठेवत शोभा यात्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते. आपल्या परंपरा, संस्कृती ही आपली मोठा वारसा आहे. याच्या जोपासनेतून भावी पिढीला चांगल्या संस्कारांचे बाळकडू मिळणार आहे. मुख्य म्हणजे यावर्षी महिला-भगिनी शोभा यात्रेचे प्रतिनिधित्व करणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या शोभा यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी-चिंचवड, पुणे.