breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पेन्शनचे पैसे काढून बँकेच्या बाहेर थांबलेल्या ज्येष्ठ महिलेचे पैसे पळवले
![Withdrew the pension money and snatched the money of the senior woman who was standing outside the bank](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/Cash-Payments.jpg)
पिंपरी – पेन्शनचे पैसे काढून बँकेच्या बाहेर मुलीची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ महिलेचे पेन्शनचे पैसे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी एम बी कॅम्प देहूरोड येथे घडली.याप्रकरणी 61 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एमबी कॅम्प देहूरोड येथील बँकेतून पेन्शनचे पैसे काढून बँकेच्या बाहेर मुलीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची नजर चुकवून निळ्या रंगाची कॅरीबॅग चोरून नेली. त्यात फिर्यादी यांचे पेन्शनचे पैसे होते. फिर्यादी यांच्या शेजारी बसलेल्या एका महिलेवर त्यांचा संशय आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.