पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद
![Water supply stopped in some parts of Pimpri-Chinchwad city on Thursday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/no-water.jpg)
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील दुरूस्तीच्या कामासाठी गुरूवारी (१३ ऑक्टोबर) पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.थेरगाव, काळेवाडी, विजयनगर, रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, पिंपळे निलख, विशालनगर, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, जिल्हा उरो रूग्णालय, सांगवी, निगडी प्राधिकरण, आकुर्डी, मोहननगर, रामनगर, संभाजीनगर, शाहूनगर, कृष्णानगर, इंद्रायणीनगर, पांजरपोळ, मोशी, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, जाधववाडी, कुदळवाडी, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर, शरदनगर, सुदर्शननगर, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, पवार वस्ती, रूपीनगर, चिखली या भागातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरूवारी सकाळचा पाणीपुरवठा होईल. तथापि, सायंकाळचा होणार नाही.शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत राहील, असे पालिकेने कळवले आहे. शहरवासीयांनी पुरेसा पाण्याचा साठा करून ठेवावा व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही केले आहे.