स्टेला सोसायटी, डुडूळगाव येथील पाणीपुरवठा होणार लवकरच सुरळीत!
- आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही - दि. २३ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे आश्वासन- आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही - दि. २३ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे आश्वासन

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी: भोसरी विधानसभा मतदारसंघातील डुडूळगाव येथील स्टेला सोसायटीमध्ये पाणीपुरवठा वाहिनीमध्ये चोकअप झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने युद्धपातळीवर काम हाती घेतले असून, पाणीपुरवठा वाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘एकतर त्यांनी जंतर मंतरला यावं नाहीतर…’, सीजेपीने सरकारसोबतच्या चर्चेसाठी ठेवली ‘ही’ मोठी अट
सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, दि. २३ जुलैपासून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि. २१ जुलै रोजी सायंकाळी स्टेला सोसायटीचे चेअरमन श्री. नितीन गावडे, मा. श्री. राजेश सस्ते, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे श्री. जे. ई. आल्हाट तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी चोकअपचे नेमके कारण शोधून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले.
त्यानुसार दि. २२ जुलै रोजी सकाळपासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. तांत्रिक तपासणीदरम्यान पाणीपुरवठा वाहिनीमध्ये दगड अडकल्यामुळे चोकअप झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित दगड काढून वाहिनीतील अडथळा दूर करण्यात आला असून, सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. सदर काम आज (दि. २२ जुलै) सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन करण्यात आले असून, दि. २३ जुलैपासून स्टेला सोसायटी परिसरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यात येणार आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही प्राधान्याने करण्यात येत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, तसेच अशा समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सज्ज राहावे, अशा स्पष्ट सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा दर्जेदार आणि अखंडित स्वरूपात मिळणे, ही आमची प्राथमिकता आहे. स्टेला सोसायटी, डुडूळगाव येथील पाणीपुरवठ्याची समस्या निदर्शनास येताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून वाहिनीतील चोकअप दूर केला असून, पाईपलाईन दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दि. २३ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असून, भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.





