breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणातील पाणीसाठा 88 टक्के

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरण परिसरात पावसाची संततधार  कायम आहे.  त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून  आजमितीला धरणात 87.68 टक्के पाणीसाठा झाला आहे. हा साठा 10 ते 11 महिने पुरेल एवढा आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. शहरासह मावळ तालुक्‍यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. धरणातील पाणीसाठा 17 टक्क्यांवर आल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची भिती व्यक्त केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वेगाने  धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली.

हेही वाचा     –      मावळ विधानसभेवर भाजपचा दावा, आमदार सुनील शेळके नाराज; म्हणाले..

काय आहे धरणातील परिस्थिती?

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 42 मिमी

# 1 जून पासून झालेले पाऊस – 1975  मिमी

# गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला पाऊस – 2882 मिमी

# धरणातील सध्याचा पाणीसाठा- 87.68 टक्के

# गेल्यावर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा – 86.34 टक्के

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button