breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या प्रतिनिधींसोबत लोकप्रतिनिधी – अधिका-यांचे ‘वेबिनार’द्वारे जनजागृती !

– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम

– पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांचाही सहभाग

पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी

चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या (CMCHSF) पुढाकाराने कोरोना आपत्ती व लॉकडाऊन बाबत वरिष्ठ अधिकारी व आमदार महेश लांडगे यांच्या बरोबर ऑनलाईन मिटिंग (वेबिनार) घेण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनाबाबत जनजागृती आणि मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

रविवारी, ( दि. 26) दुपारी 12 ते 1 ह्या वेळेत ही ऑनलाइन वेब मिटिंग (Webinar) आयोजित करण्यात आलेली आहे. मीटिंगमध्ये खालील अधिकारी व पदाधिकारी   मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सहकार भवनचे उपरजिस्टार  श्री. आघाव, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहभागी होणार आहेत.

सोसायटी सदनिकाधारक नागरिक कोरोना आपत्ती व लॉकडाऊन बाबत प्रश्न, शंका असतील ते 8975282377 ह्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतात.  आपले प्रश्न सोसायटीच्या नावासहित पाठवावे. महत्वाचे निवडक प्रश्न मार्गदर्शकांना मीटिंगमध्ये विचारले जातील, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेबिनार जॉईन करण्यासाठी काय करावे?

मोबाईलद्वारे :

1. सर्वात प्रथम प्ले स्टोअर वरून Microsoft Teams ऍप इन्स्टॉल करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.teams&hl=en

2. या मिटिंग लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/353u2dp

3. App मार्फत ओपन करा Click ‘Open it’

4. ‘Join as a guest’ क्लिक करा

5. तुमचे नाव लिहा व Join करा

6. फोन कॅमेरा आणि माईक off  ठेवा.

संगणक किंवा लॅपटॉपद्वारे :

1. या मिटिंग लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/353u2dp

2. तुमचे नाव लिहा, वेब कॅमेरा आणि माईक off करा आणि ‘Join now’ क्लिक करा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button