breaking-newsपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: वाढदिवसाचा खर्च टाळून डॉ. संतोष बारणेंची ‘रुग्णसेवा’

रुग्णवाहिका लोकार्पण : कोरोनाच्या संकटात परिसरातील नागरिकांना मदत

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष बारणे यांनी आपल्या सामाजिक कार्याचे आणखी एक आदर्शवत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. कोरोना विषाणुच्या संकटकाळात नागरिकांची गरज लक्षात घेवून डॉ. बारणे यांनी आपल्या वाढदिनी रुग्णवाहिका लोकार्पण करणार आहेत.

‘         मदत नव्हे कर्तव्य’उपक्रमांतर्गत कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर डॉ. संतोष बारणे यांनी विविध माध्यमातून भोसरी-मोशी भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून येत्या ३० मे रोजी रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात येणार आहे.

          डॉ. बारणे म्हणाले की, भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध उपक्रम हाती घेत आहे. देशावर आज कोरोनाचे संकट आले आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आम्ही यावर्षी वाढदिवस साजरा न करता. त्या पैशातून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील नागरिकांना वैद्यकीय कारणास्तव तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. डॉ. संतोषशेठ सिताराम बारणे मेडिकल व सोशल फाउंडेशनतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे.

          कोरोनाच्या संकटात नागरिकांना मदत…

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन करण्यात आले. परिणामी, शहरातील उद्योग-व्यावसाय गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे कामगार, कष्टकरी, मजुरांची उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. संतोष बारणे यांनी बांधकाम मजुरांना जीवनाश्यक वस्तुंचा संच, सॅनिटाईझर, मास्क आदी वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर परिसरातील मुक्या प्राण्यांना खाद्य देण्यात आले. विशेष म्हणजे, शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करीत  रक्तदान शिबिरही घेण्यात आले. त्याचा फायदा अनेक रुग्णांना झाला आहे. तसेच, वाढदिवसानिमित्त डॉ. बारणे यांच्या पुढाकाराने पुन्हा आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button