breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
#Waragainstcorona: मुर्गा बनाया…लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांचा ‘मॉर्निंग तडका’(व्हीडिओ बघाच)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. मात्र, काही महाभाग मॉर्निंग वॉकला बाहेर निघतात आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. अशा बेफिकीर नागरिकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
मोटार वाहन विरोधी पथकाचे अधिकारी /कर्मचारी यांनी भोसरी MIDC पोलीस ठाणे हद्दीत मोशी प्राधिकरण याठिकाणी कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव रोखनेकरिता उपाययोजना म्हणून सकाळी मॉर्निंग वॉक करीत आलेले 13 जणांना ताब्यात घेतले. भरसस्त्यावर सकाळी-सकाळी संबंधितांना आद्दल घडावी म्हणून ‘मुर्गा’ बनवले. ते कसे ते आमच्या व्हीडिओमध्ये बघाच..!