breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#waragainstcorona: पुण्यातील कोरोनाबाधित पेशंट पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल करण्यास विरोध : आमदार महेश लांडगे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे शहरातील कोरोना बांधीत काही पेशंट पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचा विभागीय आयुक्तांचा प्रयत्न असल्याचे समजले. दरम्यान, असा प्रयत्न झाल्यास पिंपरी चिंचवडकर तो हाणून पाडतील, प्रसंगी रस्त्यावर उतरून विरोध करतील असा इशारा भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढते आहे. त्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती आटोक्यात आहे. टाळेबंदीमुळे शहरात कोरोनाचा विशेष प्रादुर्भाव नाही. दीड महिन्यात फक्त १०७ रुग्ण आणि चार मृत्यू झाले. रोज १०० ते १२५ नवीन रुग्णांची भर पडते आहे. उपचारासाठी रुग्णालये कमी पडू लागल्याने आता तेच रुग्ण पिंपरी चिंचवड शहरात आणायचे असा प्रस्ताव आहे. विभागीय आयुक्त पातळीवर अशा हालचाली सुरू आहेत. असा कोणताही प्रयत्न झालाच तर त्याला आमचा कडवा विरोध राहिल, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.
आ. लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने कोरोनाच्या बंदबस्तासाठी एकदम व्यवस्थित नियोजन केले आहे. काही अपवाद वगळता रुग्णांच्या कुठेही तक्रारी नाहीत. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने शहरातील एकूण रुग्णालये, दवाखाने, डॅक्टर्स यांची संख्या संभाव्य परिस्थिती याचा अंदाज घेऊन नियोजन केले आहे. उद्या शहरात रुग्णांची संख्या वाढलीच तर त्याची गरज लागणार आहे. अशा परिस्थितीत पुणे शहरातील रुग्ण पिंपरी चिंचवडला आणून उपयोग नाही. आम्ही ते कदापी होऊ देणार नाही. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही त्याबाबत कल्पना दिली आहे. त्यानंतरही विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतलाच तर प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button