breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#WAR AGAINST CORONA: मावळातून कोरोनाला ‘हद्दपार’ करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा ‘बुस्टर डोस’

– आरोग्य विभागासाठी ५० लाख रुपयांची वैद्यकीय सामुग्री खरेदी

– जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याशी समन्वय करुन उपायोजना

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

मावळ तालुक्यातून कोरोनाला ‘हद्दपार’करण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी एकीकडे गरजु कुटुंबियांना मदतीचा हातभार दिला आहेच. तर दुसरीकडे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महत्त्वूपर्ण निर्णय घेतला. अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी ५० लाख रुपयांची निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे मावळातील आरोग्य व्यवस्थेतला ‘बुस्टर डोस’अर्थात चालना मिळणार आहे.

          महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ६९० इतकी झाली आहे. त्यापैकी मुंबईत सर्वाधिक ३७७ रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी एकाच दिवसांत २१ रुग्ण (पुणे-१७, पिंपरी-चिंचवड- ४) आढळले आहेत. विशेष म्हणजे, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा ३४ इतका झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. उपलब्ध साधनसामुग्रीचा विचार करता कोरोनाचे रुग्ण वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. ही बाब ओळखून मावळातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याबाबत आमदार सुनील शेळके यांनी तातडीने निर्णय घेतले आहेत.

          आमदार सुनील शेळके म्हणाले की, पुणे जिल्ह्यात माझ्या स्थानिक आमदार विकास निधीतून मावळ मतदारसंघामध्ये कोविड-19 या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रसामुग्री साहित्य व वैद्यकीय उपकरणे खरेदी करीता संबंधित विभागाला रुपये ५० लक्ष उपलब्ध करून दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सक्षम केल्या जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास रुग्णांची संख्या वाढणार आहे. या रुग्णांवर स्वतंत्रपणे उपचार करण्याची व्यवस्था प्रशासकीय स्तरावर करणे चालू आहे. त्याचप्रमाणे अशा संभाव्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची गरज भासणार आहे. त्यासाठी आम्ही गांभीर्याने तयारी करीत आहोत.

आरोग्य विभाग काय खरेदी करणार?

मावळ विधानसभा मतदारसंघातील दोन ग्रामीण रुग्णालय, सहा प्राथिमक आरोग्य केंद्र, तीन नगरपालिका क्षेत्र तसेच आपत्कालीन परिस्थितीत तीन नवीन आणि तीन तात्पुरती रुग्णालये आहेत. त्यासाठी 1500 एन 95 मास्क,  एक हजार पीपीई किट, दोन हजार हॅण्ड सॅनिटायझर, तीन हजार नॉन स्ट्रेलाईझ ग्लोज, 400 सोडियम हायप्लो क्लोराईड, चार हजार ट्रीपल लेअर मास्क, 12 नॉन कॉनटॅक्ट स्कॅनर, दोन, व्हेंटिलेटर, तीन हजार कोवीड तपासणी कीट आणि 44 पेशंट बेड मॅटसह हे सर्व साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार निधीतून खर्च करण्यात येईल, असेही आमदार शेळके यांनी म्हटले आहे.

मावळातील २० हजार कुटुंबियांना ‘मदतीचा हात’

‘सामाजिक भान ठेवुया, गरजूंना मदतीचा हात देऊया..’ या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील आदिवासी, कातकरी, मजूर, बेघर अशा हातावर पोट असणाऱ्या सुमारे २० गरजू कुटुंबियांना घरपोच अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्याबाबत पंचायत समिती आणि प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली आहे. यासह सामाजिक स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि दानशुर व्यक्ती यांना आवाहन केले आहे. लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, रोजगार निर्मितीची साधने बंद असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंब, मोलमजुरी करणारे यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील कुठलीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून विभागानुसार मदत कक्ष स्थापन करीत आहोत. काही जीवनावश्यक वस्तूंचा संच करून प्रत्येक कुटुंबाला किमान महिनाभर पुरेल अशा वस्तू देणार आहोत, अशी माहिती सुनिल शेळके यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button