breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेची मतदान जनजागृती मोहिम

पिंपरी : सार्वत्रिक विधानसभा निवडणुक 2024 च्याअनुषंगाने नागरिकांना मतदानाचे )महत्व पटवून देणेआवश्यक असून त्यांना मतदान करण्यास जागृत करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी मतदान करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मतदान टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुषंगाने सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथील लोकमान्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा      –        मनोज जरांगे पाटील यांची रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये शांतता रॅली

चिंचवड येथील लोकमान्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग यांना मतदानाचे महत्व पटवून देत निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या अर्ज नंबर 6, 6 अ, 7 ,8, 8 अ, बद्दलची संपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. तसेच व्होटर हेल्पलाईन अॅप आणि निवडणूक विभागाच्या संकेतस्थळांची माहिती सर्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज 6 ,6 अ, 7, 8, 8 अ हे निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे अर्ज आहेत. अर्ज नंबर 6 हा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वापरण्यात येत असून 6 अ हा अर्ज परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी उपयुक्त आहे. अर्ज नंबर 7 हा मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी वापरले जाते. अर्ज नंबर 8 मतदार यादीत सामाविष्ट करण्यात आलेली चुकीची माहिती जसे की नाव, पत्ता, वय किंवा अन्य माहिती दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येत असून 8 अ नंबरचा अर्ज मतदारांना विधानसभा अंतर्गत नाव स्थलांतर करण्यासाठी भरण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. यावेळी चिंचवड विधानसभा नोडल अधिकारी राजीव घुले आणि स्वीप टीमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते फॉर्मचे वाटप करण्यात आले.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रामध्ये नव मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान राबविले जात असुन सदर मोहिमेअंतर्गत मयत अथवा स्थलांतरित मतदाराचे नाव वगळणे, नावामध्ये किंवा पत्त्यात दुरुस्ती करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहेत, नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने (voters.eci.gov.in अथवा voter helpline app) किंवा नजीकच्या मतदान केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे.

‘लोकशाहीतील युवकांची भूमिका महत्वाची असल्याने युवा मतदार व विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवून इतरांना नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करावे. तरी नवमतदार आणि नागरिकांनी voters.eci.gov.in किंवा voter helpline app व्दारे जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button