Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णानगरमध्ये विविध उपक्रम

पिंपरी | मारुती जाधव मित्र परिवार यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नोकरी महोत्सव, रक्तदान शिबिर आणि महिलांसाठी आरोग्य तपासणी अशा उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपक्रमांतर्गत 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर 160 तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच साडेतीनशे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

हेही वाचा     :            मुंबईतील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी ‘पाताल लोक’ प्रकल्प; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सारिका पवार, कविता हिंगे, माजी नगरसेवक अजय सायकर यांसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. सुहास ताम्हाणे, यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर, प्रीती बोंडे, महादेव कवितके, पोपट हजारे, हर्जित बारडा, शैलेश कुलकर्णी, विजय घोडके, नितीन आकोटकर, अतुल सोंडेकर, महेश गायकवाड, पन्नालाल जाधव, सागर नरळे, शुभम मोरे, दशरथ शिंदे, सुरेश वैरागर, संतोष माळी, संदीप रोकडे, एड. महेंद्र कुमार गायकवाड, भगवान शिंदे, नर्सिंग वैरागर, दत्ता धर्मे, अभी जाधव, तेजस कडलक, मयूर भोसले, अक्षय ओहोळ, कुणाल पळसकर, धनंजय जाधव यांसह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महिलांच्या तसेच युवकांच्या सहभागामुळे हा वाढदिवस उपक्रममय आणि सामाजिक भान जपणारा ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button