पिंपरी / चिंचवड

घरात घुसून धमकी देत वाहनांची तोडफोड : चाकण येथील प्रकार

पिंपरी l प्रतिनिधी

घरात बेकायदेशीरपणे घुसून धक्काबुक्की करत दमदाटी केली. घरावर दगडफेक करून घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री साडेदहा वाजता मार्केट यार्ड शेजारी, चक्रेश्वर हाऊसिंग सोसायटी, चाकण येथे घडली.

अमर बाबासाहेब शिंदे (वय 39, रा. मार्केट यार्ड शेजारी, चक्रेश्वर हाऊसिंग सोसायटी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल किसन कांडगे (रा. चाकण) आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी शिंदे यांना मारण्यासाठी त्यांच्या घरात आरोपी बेकादेशीरपणे आले. फिर्यादी यांच्या वडिलांना धक्काबुक्की करत ‘अमर कुठे गेला आहे. तुम्ही बाहेरून आले आहेत. माझ्या जीवावर मोठे झाले आहेत. तुम्हाला सोडणार नाही’ असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांनतर आरोपींनी फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली. फिर्यादी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगड मारून वाहनांची तोडफोड केली. फॉर्च्युनर कारला आरोपींनी त्यांच्या कारने ठोस मारून नुकसान केले. फिर्यादी  यांच्या घराच्या परिसरात आरोपींनी दहशतीचे वातावरण निर्माण केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button