breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यमुनानगर ठाकरे मैदानात 18 ते 45 वयोगटातील लसीकरण सुरू करावे – उत्तम केंदळे

पिंपरी / महाईन्यूज

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्याअनुषंगाने सध्या शहरात आज रोजी आठ ठिकाणी या वयोगटातील लसीकरण ऑनलाईन बुकिंग पद्धतीने चालू आहे. यमुनानगर येथील नागरिकांसाठी ठाकरे मैदानावर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करावे, अशी मागणी क्रिडा समिती सभापती उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केंदळे यांनी म्हटले आहे की, यमुनानगर ठाकरे मैदान येथील स्केटिंग रिंग मध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना सुद्धा लसीकरण लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे. प्रभागातील बहुतांश ज्येष्ठ आणि 45 वर्षावरील नागरिकांनी लस घेतली आहे. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना सुध्दा लस देण्यात यावी, अशी मागणी प्रभागात होत आहे. त्यासाठी लागणा-या सुविधा व व्यवस्था स्केटिंग रिंगमध्ये उभारण्यात आल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button