Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भुजबळ चौक-वाकड परिसरातील सर्विस रस्त्यांवरील खड्ड्यांवर तातडीने उपाययोजना

स्ट्रॉम वॉटर लाईनसह रस्त्याचे काम सुरू : आ. शंकर जगताप यांच्या सूचनेनुसार मनपा व NHAIच्या संयुक्त पथकाची पाहणी

पिंपरी-चिंचवड : भुजबळ चौक, वाकड येथील द अ‍ॅड्रेस सोसायटीसमोरील नॅशनल हायवे लगतच्या सर्विस रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची समस्या निर्माण झाली होती. ही बाब निदर्शनास येताच आमदार श्री. शंकरभाऊ जगताप यांनी त्वरित संबंधित विभागांना निर्देश दिले.

या सूचनेनंतर आज विशालआप्पा कलाटे, भारतीताई विनोदे, रामभाऊ वाकडकर, प्रसाद कस्पटे, श्रीनिवास कलाटे, निखिल भंडारे, अतुल कलाटे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत मोरे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अभियंता शुभम माळी आणि ईश्वर राजपूत यांच्या समवेत सर्विस रस्त्यांची पाहणी केली.

पाहणीनंतर तातडीने खड्डे भरण्याचे आणि नवीन स्ट्रॉम वॉटर लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसांत हे काम पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

तसेच, भुजबळ चौक ते भुमकर चौक दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या सर्विस रस्त्यांचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणीलाही खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले असून, हे काम पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या त्वरित हालचालीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही सकारात्मक कारवाई ठरली आहे.

हेही वाचा – मुंबईत दोन वाघांच्या डरकाळ्या… मेळाव्यातून ठाकरे आणि शिंदेंची तोफ धडाडणार

नागरिकांनी व्यक्त केले समाधान…

भुजबळ चौक, वाकड परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी आमदार श्री. शंकरभाऊ जगताप आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. स्थानिक रहिवासी श्री. अमोल पाटील म्हणाले, “या भागातील सर्विस रस्त्यावर मोठे खड्डे आणि पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका होता. काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा अपघातही झाला होता. वेळीच हस्तक्षेप करून काम सुरू केल्यामुळे मोठा अपघात टळला.” सौ. नेहा जाधव, स्थानिक महिला रहिवासी म्हणाल्या, “आम्ही अनेकदा या समस्येबाबत तक्रारी केल्या होत्या. अखेर आमदार साहेबांनी लक्ष घालून कामाला गती दिली हे समाधानकारक आहे. स्ट्रॉम वॉटर लाईन बसवल्यामुळे पाणी साचण्याचा प्रश्नही सुटेल.” श्री. संजय काळे, वाहनचालक म्हणाले, “ही मुख्य सर्विस रोड असल्याने रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे येत होते. आता रस्ता दुरुस्त होत असल्याने आराम मिळेल.” तसेच, नागरिकांनी दिर्घकालीन आणि दर्जेदार कामासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button