अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/accident.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या कालावधीत पुणे-नाशिक महामार्गावर वाकी गावच्या हद्दीत घडला.
मयूर विलास वीरकर (वय 35, रा. खेड. मूळ रा. अहमदनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जयदीप सोनवणे यांनी 26 मे रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर वीरकर हे 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या कालावधीत पुणे -नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून जात होते. ते वाकी गावच्या हद्दीत आले असता त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये मयूर वीरकर हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.