तळेगाव आणि चिंचवडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूकीचे दोन प्रकार
पिंपरी l प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे आणि शाहूनगर चिंचवड येथे फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे दोन प्रकार घडले आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 26) तळेगाव दाभाडे आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुचिता बाबुराव चव्हाण (वय 78, रा. नाशिक) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुर्यकांत शांताराम चव्हाण (रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फ्लॅटची विक्री करण्यासाठी विसार पावती केली. फिर्यादीकडून 22 लाख रुपये घेतले. फिर्यादी आणखी नऊ लाख रुपये देण्यास तयार असताना देखील आरोपीने फिर्यादिसोबत व्यवहार न करता तिस-या व्यक्तीला 25 लाख रुपयांना फ्लॅट विकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
विशाल सीताराम घुले (वय 43, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय चंद्रसेन पिल्लई (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना शाहूनग येथील एक फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 21 लाख रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांनतर त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.