पिंपरी / चिंचवड

चाकण परिसरात मोबाईल हिसकावण्याच्या दोन घटना

पिंपरी l प्रतिनिधी

नाणेकरवाडी येथे दोन पादचा-यांचे मोबाईल फोन हिसकावले. या दोन्ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजताच्या कालावधीत घडल्या. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात साईनाथ लक्ष्मण राजुरे (वय 37, रा. येलवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नाणेकरवाडी येथील सुदामा पोहे इमारतीच्या समोरून फोनवर बोलत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 10 हजारांचा मोबाईल फोन हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात विशाल धनकुमार राम (वय 22, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी फिर्याद दिली आहे.नाणेकरवाडी येथे आळंदी फाट्याकडे चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या हातातून 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button