पुनावळे, हरगुडेवस्ती येथे दोन घरफोड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/burglary-gharfod.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पुनावळे येथे अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते पाच वाजताच्या दरम्यान घडली. हरगुडेवस्ती चिखली येथे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 13 फेब्रुवारी रोजी हरगुडेवस्ती चिखली येथे घडली.
सलीम बाबुमिया शेख (वय 42, रा. साईनगर, पुनावळे) यांनी मंगळवारी (दि. 22) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते पाच वाजताच्या दरम्यान फिर्यादी सलीम यांचे घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 42 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
ब्रजेश ब्रह्मा सिंह (वय 34, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी मंगळवारी (दि. 22) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान फिर्यादी ब्रजेश यांचे घर कुलूप लावून बंद होते. या कालावधीमध्ये चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व साथीदार यांचा मोबाईल असा एकूण 34 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.