Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराच्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कंपोस्ट प्लांट उभारा; तुषार कामठे

कचरा समस्येवर मात करण्यासाठी मागणी : शहरातील कचरा समस्येबाबत पालकमंत्र्यांना निवेदन

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे कचरा डेपो उभारण्यात आला आहे. संपूर्ण शहराचा कचरा या डेपोमध्ये टाकला जातो. पालिकेने पुनावळे या भागामध्ये नव्या कचरा डेपोसाठी हालचाली सुरू केल्या. मात्र येथील प्रचंड नागरीकरण, नियोजित डेपोच्या जागी असलेली दाट वनराई यामुळे नागरिक तसेच पर्यावरण प्रेमींनी येथे कचरा डेपोसाठी विरोध केल्यानंतर हा डेपो कागदावरच आहे त्यामुळे भविष्यातील कचरा समस्या लक्षात घेऊन शहरातील प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कंपोस्ट प्लांट उभारण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत तुषार कामटे यांनी निवेदन दिले आहे तसेच त्यांनी याबाबत पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच पर्यावरण मंत्र्यांनाही या मागणीबाबत कळविले आहे.

तुषार कामठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर होत चालली आहे. मोशी येथील कचरा डेपोत कचऱ्याचे डोंगर उभे आहेत. तेथे तब्बल ३० वर्षांपासूनचा कचरा साचला आहे. वाढत्या शहरासाठी मोशी या एकाच ठिकाणी कचरा जमा न करता पुनावळे येथे कचरा डेपो निर्माण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र, पुनावळे येथे कचरा डेपो उभा राहिल्यास तेथील नागरी वस्तीस व बाजूला असलेल्या आयटी कंपन्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. तसंच येथील २२ हेक्टर जागेमध्ये हजारो वृक्ष उभे असून या नवीन कचरा डेपोच्या निर्मितीसाठी या झाडांची वृक्षतोड केली जाईल. तसंच कचरा डेपोमध्ये वारंवार लागणाऱ्या अग्नीमुळे हवा प्रदूषण व हानीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा  :  प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ, पुरुषांसोबत महिलांच्याही नावावर होणार घर

मागील हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत यांनी पुनावळे येथील कचरा डेपोवर स्थगिती आणली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पालिकेच्या आयुक्तांनी याबाबतचा शासकीय अध्यादेश आम्हाला प्राप्त झाला नसल्याचे म्हटले आहे. यावर सात दिवस उपोषण आंदोलन करूनही समाधानकारक उत्तर पालिका प्रशासनाकडून मिळाले नाही. यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन फक्त पुनावळे येथेच हा कचरा डेपो न बनवता पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात कंपोस्ट प्लांट उभारला तर शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सुलभरित्या करता येऊ शकेल. यामुळे होणारे कोट्यावधी रुपयांचे पालिकेचे नुकसान वाचून शहरात कचरा व्यवस्थापन नागरिकांमार्फत केले जाईल. असेही कामठे यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पुनावळे येथील कचरा डेपो रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रशासन यासाठी कोणताही शासकीय अध्यादेश उपलब्ध झाला नसल्याचे सांगत असल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कंपोस्ट प्लांट उभारावा अशी मागणी केली आहे. यामुळे पालिकेमार्फत करण्यात येणारा कचरा वाहतूकीचा खर्च देखील वाचू शकतो. याचा फायदा भविष्यात शहराच्या विकासाला होऊ शकतो, त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कंपोस्ट प्लांट उभारणेबाबत आपण योग्य ती कार्यवाही करून अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या देण्याची मागणी केली आहे.

– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button