पिंपरी-चिंचवड : शौर्य दिनानिमित्त दापोडी येथे शूरविरांना मानवंदना
राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांचा पुढाकार
![Tribute to heroes at Dapodi on the occasion of Valor Day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/pimpri-chinchwad-780x470.jpg)
पिंपरी : भीमा कोरेगाव येथील २०६वा शौर्य दिनानिमित्त दापोडी येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी ५०० शहीद शूरविरांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
भीमा कोरेगाव इथे १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली होती. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभ बांधण्यात आला. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन अनुयायांकडून मोठ्या उत्साहात साजरा होतो. या विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह भेट देत मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो आंबेडकर दरवर्षी मोठ्या उत्साहाने भीमा कोरेगावला येतात.
हेही वाचा – पिंपरी : १००व्या नाटय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
इंग्रजांच्या सत्ताकाळात ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’ असे लिहित शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारला त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. हा इतिहास जुलमी विचारसरणीविरोधात लढण्याची प्रेरणा कायम देत राहील.
यावेळी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, एलआयबीचे अधिकारी अडसूळ, मैत्री ग्रुपचे भाऊसाहेब मुगुटमळ, रवी कांबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस झोपडपट्टी सेल अध्यक्ष सुनीताताई अडसूळ, धोंडाबाई गायकवाड, संगीता सोनवणे, विद्याताई गायकवाड, फमिदा शेख, सचिन गायकवाड, अशोक कांबळे, हर्षल मोरे (उपाध्यक्ष रा. यु. काँग्रेस पिं. चिं. शहर ), दिपक भाऊ साळवे, अशोकभाऊ कांबळे (पेंटर), सनी खंडागळे, प्रणव गायकवाड, चेतन जोशी, अमित घाडगे, अजय खंडागळे, अमित जाधव, सचिन शेलार, नंदू भुजंग, बंडूभाऊ गायकवाड, अखिल काझी, विलास शिंदे, मनिष बोदडे, गणेश आटोळे, ऍप्पल ओसवाल, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पुरुष, महिला, लहान मुलं, युवक, युवती व शेखर भाऊ युवा प्रतिष्ठान ग्रुप, स्वरूप सिंधू माई महिला बचत गट ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.