breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीस बंदी

पिंपरी : शाळा आणि महाविद्यालय यांना उन्हयाळ्याची सुटी लागल्यामुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाण वाढ होत असते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट हद्दीत घाट सेक्शन व मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग व एन. एच ४८ असा संयुक्तिक महामार्ग एकत्र येत असल्याने वाहनांचे प्रमाण अधिक होऊन वाहतूक संथ गतीने चालू असते. वाहतूक नियमन करण्यासाठी खालील प्रमाणे प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी शोल्डर लेनवर तसेच पार्कींगच्या ठिकाणी थांबवून हलक्या वाहनांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर  होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहा एप्रिल ते नऊ एप्रिल असे तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान वाहतुकीस बंदी घालण्यात येणार असून ही वाहने कडेला थांबवण्यात येणार आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहन चालक, मालकानी नमूद वेळेमध्ये वाहने आणू नयेत असे देखील आवाहन बोरघाट महामार्ग पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा – चंद्रकांतदादा,अजितदादा व उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवारी पिंपरीत बैठक

मोटारींच्या  संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे मर्गिकवेरील ताण कमी करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई वाहिनीवरील वाहतूक खंडाळा बोगदा या ठिकाणी थांबवून पुणे वाहिनीवरील वाहतूक विरूध्द दिशेने वळविण्यात येणार आणि वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तापमान वाढीमुळे जड अवजड वाहने बंद पडत आहेत. त्यांना क्रेन, पुलर, पोलीस क्रेनच्या सहाय्याने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पहिल्या मार्गिकेवर चालणाऱ्या जड अवजड वाहन चालकांवर खटला भरून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बोरघाट पोलिसांनी जड अवजड वाहन मालक आणि चालक संघटना यांना आवाहन केले आहे की, त्यांनी सहा एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे मर्गिकेवर सकाळी सहा ते दुपारी बारा यावेळेत प्रवास टाळावा.

अतिरिक्त पोलीस महसंचालक सुखविंदर सिंह, रायगड परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक घनःश्याम पलंगे, पनवेल विभागाच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बोरघाट महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button