पिंपरी / चिंचवड

सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्या प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

वेश्या व्यवसायासाठी सार्वजनिक सभ्यतेचा भंग करून नागरिकांना हातवारे करत अडथळा निर्माण केला. याप्रकरणी तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी सव्वा पाच वाजता संविधान चौक भोसरी येथे घडली.

याप्रकरणी दीपक गुजर (वय 33, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी, पिंपळे गुरव आणि देहूरोड येथे राहणा-या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणा-या जाणा-या लोकांना अडथळा निर्माण केला. आरोपी महिलांनी सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिन्ही महिलांना फौजदारी प्रकिया संहिता 1973चे कलम 41 (1) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button