चक्रपाणी वसाहत येथे दोघांचे मोबाईल फोन हिसकावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/mobile-chori-crime.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
चक्रपाणी वसाहत भोसरी येथे अज्ञात व्यक्तीने दोघांचे मोबाईल फोन हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साव्वाथ वाजता घडली.
राजकुमार जगन राम (वय 30, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुळवेवस्ती येथून धावडेवस्ती भोसरी येथे घरी जात होते. रस्त्याने जाताना ते मोबाईल फोनवर बोलत जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती आला. त्याने फिर्यादी यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला आणि निघून गेला. त्यानंतर मयूर आनंता धुमाळ (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांचाही 18 हजारांचा मोबाईल फोन आणि 19 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने हिसकावल्याची घटना घडली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.