पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

पिंपरी l प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास यमुनानगर निगडी येथे करण्यात आली.
अजय अरुण गायकवाड (वय 23, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक केराप्पा माने यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय गायकवाड याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी यमुनानगर निगडी येथे कारवाई करत अजय गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा एक लाख दोन हजारांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करत अजय गायकवाड याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गिरीगोसावी तपास करीत आहेत.




