शहरात सोमवारी चार केंद्रांवर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस
![The vaccine will be available at four centers in the city on Monday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Britain-starts-corona-vaccination.jpg)
- लस उपलब्ध नसल्याने सोमवारी ‘कोविशील्ड’चे लसीकरण सोमवारी बंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी (दि. 25) लसीकरण सुरू आहे. शहरात सोमवारी 2 केंद्रांवर 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना तर 2 केंद्रांवर 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सीन’ लस मिळणार आहे.सोमवारी (दि. 26) कोव्हॉक्सीन लसीचा वय 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस झालेल्या एकूण लाभार्थ्यांना दोन केंद्रांवर एकूण 200 लाभार्थी क्षमतेने दिला जाणार आहे. त्यापैकी 160 लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल.
तसेच प्रायोगिक तत्वावर पिंपरी चिंचवड महापालिका केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीद्वारे टोकन घेतलेल्या आणि महापालिकेमार्फत लसीकरणाबाबत एसएमएस संदेश आलेल्या 40 लाभार्थ्यांचे सकाळी 10 ते सायंकाळी पाच या कालावधीत लसीकरण करण्यात येईल.
खालील दोन केंद्रांवर मिळेल कोव्हॅक्सीन लस –
# स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेज नगर
# अश्विनी मेडिकल फाउंडेशन, मोरया हॉस्पिटल, चिंचवड
सोमवारी कोव्हॅक्सीन लसीचा 45 वर्षापुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 दिवस) दोन लसीकरण केंद्रांवर एकूण 200 क्षमतेने दिला जाईल. त्यापैकी 160 लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपद्वारे केले जाईल. तसेच प्रायोगिक तत्वावर पिंपरी चिंचवड महापालिका केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे टोकन घेतलेल्या आणि पालिकेमार्फत लसीकरणाबाबत एसएमएस संदेश प्राप्त झालेल्या 40 लाभार्थ्यांचे सकाळी 10 ते सायंकाळी पाच या वेळेत लसीकरण करण्यात येईल.
खालील दोन केंद्रांवर 45 वर्षांपुढील लाभार्थ्यांना मिळेल कोव्हॅक्सीन लस –
# नवीन भोसरी रुग्णालय
# पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिंपळे निलख दवाखान्याजवळ
कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी सोमवारी (दि. 26) सकाळी आठ नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येणार आहे.महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी नऊ वाजल्यानंतर टोकन वाटप करण्यात येईल. नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. कोविशील्ड लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने सोमवारी कोविशील्डचे लसीकरण बंद राहणार आहे.