पिंपरी / चिंचवड

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोघांना दरोडा टाकून लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाच जणांनी मिळून दरोडा टाकून लुटले. पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) पहाटे साडेचार वाजता उर्से परिसरात घडली.

आदर्श अनिल चौधरी (वय 19, रा. लोणावळा), अजय गुलाब साळुंके (वय 19, रा. दत्तवाडी, मुळशी), संजय मारुती चव्हाण (वय 22, रा. लोणावळा), गणेश राजू काळे (वय 22, रा. वडगाव मावळ), अमृत रवी जाधव (वय 18, रा. दत्तवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. जमाल कमल खान (वय 27, रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक चालक आहेत. ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबईच्या दिशेने जात होते. उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फूडमॉल येथे रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून फिर्यादी आणि त्यांचा भाऊ लघुशंका करीत होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा भावाला चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 19 हजारांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button