पिंपरी / चिंचवड
ट्रक चालकाने ट्रकमधील पावणे दोन लाखांच्या सळया चोरल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Crime.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
ट्रक चालकाने मालकाच्या परस्पर ट्रक मधील एक लाख 80 हजार रुपये किमतीच्या लोखंडी सळया चोरल्या. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री नऊ वाजता शेलपिंपळगाव गावच्या हद्दीत हॉटेल वैष्णवी येथील पार्किंगमध्ये घडली.
काकासाहेब नाना कुत्तारवाडे (वय ४८, रा. कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबू भाऊसाहेब सोनावणे (रा. आष्टी,जि. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या ताब्यातील ट्रक मधून आरोपीने एक लाख 80 हजार रुपयांच्या दोन हजार 400 किलो वजनाच्या लोखंडी सळया चोरल्या. हा प्रकार त्याने शेलपिंपळगाव येथील हॉटेल वैष्णवी येथे जेवणासाठी थांबल्यानंतर केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.