वाल्हेकरवाडी येथे आयोजित दिवाळी फराळ, स्नेह मिलन, सुगम संगीत गीतांचा कार्यक्रम उत्साहात
- पिंपरी चिंचवड ब प्रभाग स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, उद्योजक आदेश नवले यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी चिंचवड |
चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड ब प्रभाग स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, उद्योजक आदेश नवले यांच्यावतीने आयोजित येथे दिवाळी फराळ, स्नेह मिलन व सुगम संगीत गितांचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. प्रभाग क्र.१६ व १७ येथे चिंतामणी चौक, स्वामी समर्थ मैदान वाल्हेकरवाडी याठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, उद्योजक सोमनाथ भोंडवे, निलेश भोंडवे यांच्यासह प्रभागातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थीत होते.
कार्यक्रमाप्रसंगी, सामाजिक कार्यात कायम सहभागी होणा-या सात महिला बचत गटाचा भेट वस्तू देवून महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विलास चव्हाण, पाटीलबुवा चिंचवडे, दिलीप गडदे, नरेश गोरखा, प्रकाश आखाडे, अमर देशमुख, समाधान सोनवणे, विजय पवार, संजय गायकवाड, अंगद गरड, अनिलराव चव्हाण, सचिन राऊत, भुषण जोशी, डॉ. दिपक चांदणे, अलका पांडे, स्नेहा गाडे, सौ. नवले, सविता पंडीत, अशोक येलमार तसेच निसर्ग सोसायटी, अथर्व पार्क, मोरया कॉलनी, भोंडवे वस्ती, गुरूदवारा, रावेतमधील सर्व सोसा.चे पदाधीकारी व नागरिकांनी फराळ व गाण्यांचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बिभीषण चौधरी तर आभार आदेश नवले, सोमनाथ भोंडवे यांनी मानले.