पावसाच्या साचलेल्या पाण्याची समस्या अखेर निकालात!
विधायक कार्य: सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा कलाटे यांचा पुढाकार!

पिंपरी-चिंचवड : वाकड येथील गोल्डफिंगर अवेनियर सोसायटी परिसरात सततच्या मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाहनचालक व पादचाऱ्यांची गैरसोय होत होती आणि परिसरात अस्वच्छतेचेही संकट निर्माण झाले होते.
या समस्येकडे सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा रणजित कलाटे यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी तात्काळ या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित महानगरपालिका विभागाशी संपर्क साधला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने त्वरेने जागेची पाहणी करून तातडीची कार्यवाही सुरू केली.
हेही वाचा – शरद पवार यांनी भाकरी फिरवली; प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाबाबत भाजपचे महसूलमंत्री बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया

स्नेहा कलाटे यांच्या पुढाकारामुळे महानगरपालिकेच्या यंत्रणांनी काही तासांतच पाण्याचा निचरा करून रस्ता पूर्ववत केला. परिणामी, नागरिकांना दिलासा मिळाला असून, वाहतूक सुरळीत झाली आहे. स्नेहा रणजित कलाटे यांचा समाजप्रती असलेला सक्रिय दृष्टिकोन आणि तत्परता यामुळेच ही समस्या तात्काळ सुटली, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यांच्या सामाजिक भान आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यात सहकार्य करणाऱ्या महानगरपालिका अधिकारी वर्गाचेही मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.
नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध..!
आगामी काळात प्रभागामध्ये पाणी साचणार नाही, शहर थांबणार नाही, असा संकल्प आम्ही केला आहे. नागरी अशा समस्या उद्भवल्यास कृपया शांत बसू नका. आपल्या भागातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यास, योग्य त्या उपाययोजना वेळेत केल्या जाऊ शकतात.” त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.





