पिंपरी / चिंचवड
जुन्या सांगावीत पाण्याचे मीटर चोरीला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/water-meter.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
जुनी सांगवी येथे दोन पाण्याचे मित्र चोरीला गेल्याचे प्रकार उकडकिस आले. याप्रकरणी सोमवारी (दि. १८) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षनाथ किसन सांडभोर (वय ६४, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या नळाला सन २००९ मध्ये पाण्याचा मीटर बसवला होता. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांनी पाण्याचा मीटर तपासला असता त्यांना तो दिसला नाही. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता रामदास हरिभाऊ देवकर यांनी सन २०१३ साली त्यांच्या पाण्याच्या नळाला बसवलेला मीटर देखील चोरीला गेल्याचे समजले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.