breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डेंग्युच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात डेंग्यु आजाराच्या निदानासाठी एकुण 4018 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये डेंग्यु आजाराचे 36 रुग्ण दुषित आढळुन आलेले असून या रुग्णांपैकी 18 पुरुष व 18 महिला रुग्ण आहेत.

तसेच चिकुनगुण्या आजाराच्या निदानासाठी एकुण 128 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले असता त्यामध्ये चिकुनगुण्या आजाराचे 03 रुग्ण दुषित आढळुन आलेले असून या रुग्णांपैकी दोन पुरुष व एक महिला रुग्ण आहेत.

डेंग्यु मुक्त पीसीएमसी (इए-ढ ऊशपर्सीश उरारिळसप) या मोहिमेअंतर्गत सोमवार ते शनिवार डास नियंत्रणाबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभाग व इतर विभागामार्फत विविध प्रकारच्या कार्यवाही केली जात आहे.

तसेच दर रविवारी नागरिकांनी प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत सकाळी 9.00 ते 10.00 हि वेळ स्वत:करीता देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा –  ‘धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेणं आत्मघातकी प्लॅन’; जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास या मोहिमेअंतर्गत आज दिनांक 28.07.2024 रोजी शहरातील माननीय लोक सभा सदस्य, माननीय विधान सभा सदस्य, माननीय विधान परिषद सदस्य, पदाधिकारी , माजी महापौर, नगरसदस्य व अधिकारी यांनी आपापल्या घरी साफसफाई व डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही केली.

यामध्ये मा. खासदार श्री. श्रीरंग अप्पा बारणे, मा. आमदार श्री महेशदादा लांडगे, श्रीमती अश्विनी ताई जगताप, श्री अण्णा बनसोडे, श्री अमित गोरखे, श्रीमती उमा खापरे व इतर सन्माननीय पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवीला व नागरिकांनी सदर मोहिमेत सहभागी होऊन आपापल्या घरी साफसफाई व डासोत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही करून पिंपरी चिंचवड शहरास डेंग्यु मुक्त करण्याचे आवाहन केले.

डेंग्यूस कारणीभूत असलेल्या आजारांच्या डासांची उत्पत्ती केवळ 10 मिली. पाण्यामध्ये सुध्दा होते याची कृपया नोंद घ्यावी. पावसाचे पाणी साठुन डासांची उत्पत्ती होऊ नये याकरीता कार्यवाही करावी व कार्यवाही करतानाचे फोटो समाजमाध्यमांवर छायाचित्रे / व्हिडिओ क्लिप्स टाकून या मोहिमेला अधिकाधिक प्रसिद्धी देण्यात यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button