मध्यस्थी करणा-यास बेदम मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/arrested-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
एका व्यक्तीला भांडण सोडवणे चांगलेच महागात पडले आहे. दोघांची भांडणे सुरू असताना या भांडणात मध्यस्थीसाठी गेल्यानंतर त्यालाच मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 10) दुपारी महात्मा फुले नगर, एमआयडीसी, भोसरी येथे घडली.
गणेश विष्णु मातंग (वय 38) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल शेख (वय 20, दोघेही रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि गायकवाड आणि आरोपी सोहेल शेख यांची भांडणे सुरू होती. या भांडणांमध्ये फिर्यादी गणेश मातंग हे मध्यस्थी करीत होते. याचा राग आल्याने आरोपी सोहेल शेख याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात हातावर आणि बरगडी वर मारून त्यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करत “तू माझ्या नादाला लागायचं नाही’, असे म्हणून धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.