ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुसंस्कृत तुषार सहाणे यांच्या नेतृत्वावर स्थानिकांचा ठाम विश्वास

प्रभाग 8: इंद्रायणीनगरच्या विकासासाठी विजयाचा ‘संकल्प’!

​ पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

“तुषार सहाणे यांचे काम म्हणजे विश्वास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचा आधार. प्रत्येकाला सोबत घेऊन, प्रत्येकाची बाजू समजून घेत समाजहिताची कामे करण्याची त्यांची पद्धतच त्यांची खरी ताकद आहे,” अशा भावना इंद्रायणी नगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधील जयगणेश साम्राज्य, समर्थ कॉलनी आणि इंद्रायणी नगर परिसरात तुषार सहाणे यांनी जोरदार प्रचार दौरा केला असून, या दौऱ्याला विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रचारादरम्यान तुषार सहाणे यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, महिलांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याची ग्वाही त्यांनी दिली. “प्रभागातील प्रत्येक महिला स्वावलंबी झाली पाहिजे. महिलांसाठी उद्योगनिर्मिती, स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेच माझे प्रथम प्राधान्य असेल,” असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा      :          इंद्रायणीनगर- भोसरी प्रभागात आता लोकसेवेसाठी समर्पित! 

महाराष्ट्र कॉलनी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान महिलांनी तुषारभाऊंचे औक्षण करत त्यांना शुभाशीर्वाद दिले. “तुषारभाऊ आहेत म्हणूनच आमचा प्रभाग प्रगतीपथावर आहे,” अशी भावना व्यक्त करत स्थानिक महिलांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा ‘संकल्प’ केला. ठिकठिकाणी झालेल्या जंगी स्वागतामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रचार दौऱ्यात तुषार सहाणे यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका, संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आणि समाजकार्याची तळमळ प्रकर्षाने दिसून आली. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या विषयांवर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. इंद्रायणी नगरसह संपूर्ण प्रभाग क्रमांक ८ मध्ये तुषार सहाणे यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि नागरिकांचा विश्वास पाहता, आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व खंबीर समर्थक युवराज पालकर म्हणाले, “तुषारभाऊ केवळ लोकप्रतिनिधी नाहीत, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून येतात. त्यांच्या कामाची पद्धत पारदर्शक असून विकासाची दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला असा नेता आमच्या प्रभागाला लाभला, हे आमचे भाग्य आहे. आम्ही सर्वजण शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांचा विजय निश्चित आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button