ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगर- भोसरी प्रभागात आता लोकसेवेसाठी समर्पित!

मिशन- PCMC : डॉ. सुहास कांबळे यांचा नागरिकांना ‘‘शब्द’’

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

भोसरीसह पंचक्रोशीमध्ये गेली 35 वर्षे रुग्णसेवा केली. साईनाथ हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वोतोपरी समाजसेवा करण्याचे व्रत जोपासले. हॉस्पिटलचे कामकाज सांभाळण्यासाठी मुलगा डॉ. …. आता सज्ज झाला आहे. त्यामुळे आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर प्रशासकीय पातळीवर लोकसेवा करण्यासाठी समर्पित भावनेतून काम करेन, असा ‘शब्द’ भारतीय जनता जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. सुहास कांबळे यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपलिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर- भोसरी प्रभागातून भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर अ गटातून डॉ. कांबळे सुहास लक्ष्मण, ब गटातून लोंढे नम्रता योगेश, क गटातून लांडगे निलम शिवराज आणि ड गटातून मडिगेरी विलास हनुमंतराव असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आरोग्यसेवेपलीकडे जाऊन समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने डॉ. कांबळे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, महिला व युवकांसाठी सुरक्षित प्रभाग, तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा       :            ​​‘अजित पवारांनी कधी सावरकरांचा विरोध केला नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य 

प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रीय विहार, पीएमआरडीए सेक्टर १२, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर आदी भागातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण आहे. विविध सामाजिक, व्यावसायिक व युवक संघटनांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

“डॉक्टर म्हणून ज्या निष्ठेने रुग्णसेवा केली, त्याच प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणूनही सेवा देईन,” असा विश्वास डॉ. सुहास कांबळे यांनी व्यक्त केला. एकूणच, भाजपाचा हा प्रोफेशनल उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकासाची नवी दिशा देईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, डॉ. सुहास कांबळे प्रभागातच वास्तव्यास आहेत. त्यांचे साईनाथ हॉस्पिटल प्रभागातच आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे या प्रभागातील नागरिकांचे ते सेवा करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत डॉ. सुहास कांबळे यांच्याकडे ‘‘विनिंग कॅन्डिडेट’’ म्हणून पाहिले जात आहे.

गेल्या ३५ वर्षांत डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करताना माणसाच्या वेदना जवळून पाहिल्या. आता आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर त्या वेदनांवर प्रशासनाच्या माध्यमातून उपाय करण्याचा संकल्प केला आहे. आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधा या मूलभूत गरजांवर प्रामाणिकपणे काम करत इंद्रायणीनगर–भोसरी प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी पूर्णपणे समर्पित राहीन.

– डॉ. सुहास कांबळे, उमेदवार, भाजपा, प्रभाग क्रमांक- 8.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button