कुदळवाडीत रंगणार खेळ पैठणीचा
![The game of Paithani will be played in Kudalwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/dinesh-yadav-mahesh-dada.jpg)
- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्यातर्फे आयोजन
पिंपरी – भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वीकृत नगरसदस्य व भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस दिनेश यादव व निशा दिनेश यादव यांच्यातर्फे होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सायंकाळी बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे हा सोहळा रंगणार असून यामध्ये पैठणीसह अनेक आकर्षक बक्षिसांची रेलचेल असणार आहे.
कार्यक्रमात लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या 6 पैठणी साड्या देण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक अशी भेट वस्तु देण्यात येणार आहे. कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास टु व्हीलर दुचाकी, दुसर्या क्रमांकास फ्रीज, तिसर्या क्रमांकास एलसीडी टीव्ही, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्यास वॉशिंग मशिन, पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यास पिठाची गिरणी, सहाव्या विजेत्यास कुलर लकी ड्रा विजेत्यास प्रेशर कुकर देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना दिनेश यादव म्हणाले की, महिला कुटुंबाचा कणा आहे. आपला संसार संभाळताना त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये असणार्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे मार्गदर्शक महेशदादा लांडगे हे नेहमीच महिलांचा आदर करतात, आणि महिलांच्या महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, त्यामुळे महिलांना रोजच्या कामातून वेळ मिळावा आणि या थोडा आनंदा घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.