breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका हद्दीबाहेर शिक्षण घेणाऱ्या शहरातील विद्यार्थ्यांची मोफत बस पास सुविधा केली बंद

 नवीन अध्यादेश त्वरित रद्द करण्याची नाना काटेंची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना महापालिका हद्दीबाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी पूर्वी मोफत बस पासची सुविधा मिळत होती. परंतू महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नवीन अध्यादेश काढून ही सवलत बंद केली आहे. त्यामुळे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हा नवीन अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना सन २००५ शिक्षण हक्क कायद्यानुसार महानगरपालिका हद्दी बाहेरील शाळेमध्ये जाण्यासाठी मोफत बस पासची सवलत मिळत होती. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दि.१०/०६/२०२४ रोजी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील रहिवासी व महानगरपालिका हद्दीत शिक्षण घेत असलेल्या ५ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थीनाच मोफत बस पासच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे असा आदेश काढलेला आहे.

हेही वाचा – ‘माझ्या जिवाला धोका’; आमदार बच्चू कडूंचं थेट पोलिस अधीक्षकांना पत्र

पिंपरी चिंचवड शहरातही चांगल्या उत्तम दर्जाचा शाळा व महाविद्यालये आहेत. परंतु महापालिका हद्दीबाहेर अनेक नामांकित व शासकीय शाळा, महाविद्यालये असून तिथे शिक्षण घेण्यास शहरातील अनेक गरजू व होतकरू विद्यार्थी जातात. त्यामुळे महापालिकेने केवळ शिक्षणास प्राधान्य द्यावे. चांगले शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी आपले उज्वल भविष्य घडवणार आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला तर आपल्याच पिंपरी चिंचवड शहराचे नाव देखील एका उंचीवर घेवून जाणार आहेत.

महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने काढलेल्या नवीन आदेशामुळे अनेक गरजू व होतकरू विध्यार्थांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होणार आहे. यासाठी पूर्वीचा आदेश कायम ठेवत विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान करणारा महापालिकेचा नवीन अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी नाना काटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button