आकुर्डीतील हॉटेल ‘ग्रँड एक्झोटीका’जवळील परिसरात लागली आग
![The fire broke out near the Hotel Grand Exotica in Akurdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/hotel.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
आकुर्डीच्या हॉटेल ग्रँड एक्झोटीकाजवळील मोकळ्या जागेत आग लागली. आज (बुधवार) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये मोकळ्या जागेत असलेले गवत, पालापाचोळा व एक सुरक्षा रक्षकाचे केबिन जळाले. प्राधिकरण व वल्लभनगर येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवले.
उप अग्निशमन केंद्र प्राधिकरण, निगडी यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास खंडोबा मंदिर, आकुर्डी येथील हॉटेल ग्रँड एक्झोटीका जवळील मोकळ्या जागेत अचानक आग लागली. मोकळ्या जागेत असलेले गवत, पालापाचोळा व एक सुरक्षा रक्षकाचे केबिन जळाले. प्राधिकरण व वल्लभनगर येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व पंधरा ते वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले.
सुरुवातील विद्युत ट्रान्सफॉर्मरला आग लागली होती. त्यानंतर ती आग इतरत्र पसरली. मात्र, तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांनी दिली.