ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामावरून काढून टाकल्याने चालकाने पेटवली 22 लाखांची कार

पिंपरी चिंचवड | चालकाला कामावरून काढल्याच्या रागातून चालकाने आपल्या भावाला सोबत घेऊन मालकिनीची कार जाळून टाकली. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटे इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कारच्या मालकिणीने गुरुवारी (दि. 16) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनोद भस्के हा फिर्यादी महिलेकडे कारवर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला फिर्यादी यांनी कामावरून काढून टाकले होते. या कारणामुळे संतापलेल्या आरोपी विनोद याने आपल्या भावासोबत इंद्रायणीनगर, भोसरी येथील तिलक रेसिडन्सी येथे येऊन सोमवारी पहाटे कारवर स्फोटक द्रव्य टाकून 22 लाख रुपयांची कार जाळून टाकली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button