breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या ‘या’ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचे डोस

पिंपरी |महाईन्यूज|

महापालिकेला ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोविशिल्ड’ची लस उपलब्ध झाली आहे. शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (बुधवारी) ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, तर ‘कोविशिल्ड’चा पहिला आणि दुसरा डोस देण्यात येणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’चा 16 केंद्रांवर तर ‘कोविशिल्ड’चा 49 केंद्रांवर लस दिली जाणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस दिली जाणार आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या नागरिकांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. तर, कोव्हॅक्सिन’चा 28 दिवसांनतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रेवस्ती, तालेरा रुग्णालय, प्रेमलोक पार्क दवाखाना, सावित्रीबाई फुले शाळा भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, पिंपरी, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, पिंपळेनिलख मधील इंगोले महापालिका शाळा, नवीन आकुर्डी रुग्णालय, ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा आणि कासारवाडी दवाखाना या केंद्रावर ‘कोव्हॅक्सिन’चा लसीचा दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे. एका केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येणार आहे.

लसीकरणाची ही आहेत केंद्र

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, रोटरी क्लब सेंटर, आरटीटीसी सेंटर, महापालिका कन्या शाळा चिखली, घरकुल दवाखाना, महापालिका शाळा जाधववाडी, रुपीनगर शाळा, स्टेकिंग गाऊंड यमुनानगर, तळवडे समाज मंदिर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल जिजामाता पार्क फुलेनगर, महापालिका शाळा खराळवाडी,नेहरूनगर उर्दू शाळा, एसएस अजमेरा स्कुल, अजमेरा, दीनदयाल शाळा संत तुकारामनगर, क्वालिटी सर्कल भोसरी, समता स्कुल चक्रपाणी वसाहत भोसरी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका शाळा बोपखेल,सखुबाई गार्डन भोसरी, मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, गंगोत्री पार्क दिघी, बाबा मंगल कार्यालय धावडे वस्ती,पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, बास्केटबॉल ग्राऊंड स्पाईन रोड मोशी,अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, गणेश इंग्लिश स्कुल दापोडी, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, खिंवसरा हॉस्पिटल थेरगाव,महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकर वस्ती, मारुती गेनू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड, यशवंतराव प्राथमिक महापालिका शाळा ग प्रभाग, भाटनगर दवाखाना पिंपरी, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा रहाटनी, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा पिंपरीवाघेरे, फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, महापालिका शाळा किवळे, गुरुद्वारा वाल्हेकरवाडी, बिजलीनगर दवाखाना, बापूराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, कामत हॉस्पिटल पिंपरी नर्सिंग स्कुल चिंचवड, मोरेश्वर भोंडवे कार्यालयाजवळ पुनावळे, अश्विनी मेडिकल फाऊंडेशन मोरया हॉस्पिटल चिंचवड, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मिळणार आहे. एका केंद्रांवर 100 जणांना लस मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button