“स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर”च्या अभ्यासक्रमाला पुणे विद्यापीठात सुरूवात
![The course of "Smart Training and Innovation Center" started at Pune University](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/pune-university-1.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सूरू करण्यात आलेल्या स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टिक) या अभ्यासक्रमाला ऑगस्ट २०२१ पासून पुणे विद्यापीठात सूरुवात करण्यात आली आहे. शहरातील विद्यार्थ्यांना रोजगाराक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यात स्किल डेव्हलपमेंट उपक्रम सुरु करण्यासंदर्भात सामजंस्य करार करण्यात आला आहे. यामध्ये मायक्रोसॉफट क्लाउड ऍडमिनिस्ट्रेशन, सॅप एबीएपी व एमएम फॉर अकाउंटस, फायनान्स अँड बँक ऑफिस आणि ऑटोकॅड इन डिझाइन इन ऑटोडेस्क या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रथम ऑनलाईन व त्यानंतर ऑनलाईन – ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
“स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर”च्या अंतर्गत येणा-या सॅप करीअर एबीएपी (SAP Careers ABAP) हा कोर्स २०० तासिकांचा असून या कोर्सची फी र.रु.४०,०००/-, सॅप करीअर एमएम (SAP Careers MM)हा कोर्स २०० तासिकांचा असून फी र.रु.४०,०००/-, ऑटोकॅड (AutoCAD) – २०० तासिका, फी र.रु.१९,५००/, मायक्रोसॉफट क्लाउड ऍडमिन (Microsoft Cloud Admin) – तासिका१८०, फी र.रु.१३,०००/-, लिनक्स ऍडमिनिस्ट्रेशन (Lunux Administration) – तासिका १८०, र.रु. १९,०००/- अशी कोर्सनुसार फी आकारली जाणार आहे. सेंटरद्वारे खासगी संस्थांतील अभ्यासक्रमांच्या किमतीपेक्षा ४० टक्के कमी किमतीत हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड हे शहर एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारुपाला आले आहे. येथील औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उददेश्य आहे. आजच्या डिजीटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगारनिर्मीती होत आहे. यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.