ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे योगदान स्फूर्तीदायक – डॉ. राजेंद्र वाबळे

जागृत नागरिक महासंघाच्या वतीने कोविड योध्दांचा सन्मान

पिंपरी चिंचवड | कोविडच्या जागतिक महामारीमुळे देशाचे आर्थिक चक्र ठप्प झाले होते. परंतू या महामारीत वैद्यकीय, आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-यांनी दिवस रात्र स्वता:च्या जीवावर उदार होऊन रुग्णसेवा केली. त्यामुळे मनुष्यहानीवर काही अंशी नियंत्रण मिळवता आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचे या काळातील योगदान स्फूर्तीदायक आहे, असे प्रतिपादन वायसीएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता (डीन) डॉ. राजेंद्र वाबळे यांनी केले.

जागृत नागरीक महासंघाच्या वतीने नुकताच वायसीएम हॉस्पिटल मधील कर्मचा-यांना कोविड योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. वाबळे बोलत होते. जागृत नागरीक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, महापालिका जनसंपर्क विभागाचे पी. बी. पुराणिक तसेच प्रकाश पाटील, दत्तात्रय काजळे, अशोक कोकणे, नीलिमा भागवत, राजेश विश्वकर्मा, उमेश सणस, सुनील गुजर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते यावेळी वायसीएमचे डॉ. अनिकेत लाठी, डॉ. पृथ्वी पटेल, डॉ. श्वेताली आखारे, मेट्रेन मोनिका चव्हाण, कर्मचारी स्वाती कुलकर्णी, अनघा भोपटकर, हेंद्रिना जॉन, मेघा सुर्वे, वैशाली शिवरकर, रत्ना रोकडे, अनिता सालगुंडी, वनिता सोनवणे, दया कुलकर्णी, भास्कर दातीर, सोलोमन मिसळ, जितेंद्र शहा, अनिता सुतार, शाम चव्हाण, दिपक परदेशी, शंकर नानी, अनिता लांडगे, प्रमिला यंदे, संभाजी नेटके, मिनाक्षी चटोले, सुनिल चौधरी, हरीश बिरदवडे आणि सामाजिक कार्यकर्ता एन. ए. हुसेन यांना कोविड योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले की, जागतिक महामारीच्या काळात पिंपरी चिंचवड मनपाच्या सर्व रुग्णालयातील कर्मचा-यांनी अखंडीतपणे सेवा दिली. या कर्मचा-यांच्या योगदानामुळे शहरातील मृत्यूच्या प्रमाणावर काही अंशी नियंत्रण मिळवता आले. या पुरस्कारामुळे आणखी चांगले काम करण्याची स्फूर्ती कामगारांना मिळेल. नितीन यादव म्हणाले की, महामारीच्या काळात आरोग्य, वैद्यकीय, पोलीस, प्रशासन, अग्नीशामक, वीज वितरण, पाणी पुरवठा अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत आहे. त्यांचा उचीत गौरव झाला पाहिजे. म्हणून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button