‘घड्याळ’’ तेच… फक्त वेळ नवी! : आशा तानाजी भोंडवे

प्रिय,
बंधू-भगिनींनो,
सप्रेम नमस्कार… रामकृष्ण हरी..!
मी सौ. आशा तानाजी भोंडवे, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक- 16 मामुर्डी- किवळे- विकासनगर- रावेत- गुरूद्वारा या प्रभागातून निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. आज मी आपल्यासमोर उभी आहे, फक्त निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर आपल्या सर्वांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी, आपल्या प्रभागाला सर्वांगीण विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी.माझ्या कुटुंबाची नेहमीच अशीच धडपड राहिली आहे – सामाजिक सेवा, शेतकरी आणि नागरिकांच्या हितासाठी काम करणे. माझे सासरे, कै. बबनराव भोंडवे, ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होऊन रावेत गावाचा विकास घडविण्यासाठी सदैव झटत राहिले.
संरक्षण विभागाने जेव्हा आपल्या शेतकऱ्यांच्या जागेवर १८०० एकर क्षेत्र बाधित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी आपल्या गावांना या निर्णयातून वाचवले, शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवले. त्यांनी शेती, बागायत आणि सामाजिक विकासासाठी केलेले योगदान आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते.
माझे पती श्री. तानाजी (आप्पा) भोंडवे यांनीही या वारशाला पुढे नेले, शेतकरी, नागरिक व सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक क्षण कार्यरत राहिले. आता ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आहे. मी सोप्या स्वभावाची, प्रामाणिक आणि समर्पित व्यक्ती म्हणून आपल्या प्रभागाचा विकास, शिक्षण, स्वच्छता, रस्ते, शेतकरी व नागरिकांचे कल्याण यासाठी पूर्णपणे समर्पित आहे.
हेही वाचा – भोसरीत राष्ट्रवादीचा प्रचार… प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम!
भोंडवे कुटुंबियांच्या प्रयत्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ मिळाली आहे. हे मार्गदर्शन आणि पाठिंबा माझ्यासाठी बळकट प्रेरणा आहे.
बंधू-भगिनींनो, लक्षात ठेवा… ‘‘घड्याळ’’ तेच… फक्त वेळ नवी! ही वेळ आहे आपल्या हक्काचा निर्णय घेण्याची, आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडण्याची. चला आपण सर्व एकत्र येऊ, आशिर्वाद देऊ आणि प्रभाग क्रमांक १६ साठी सच्चा प्रतिनिधी निवडू. आपण एकत्र उभे राहिलो तर आपले रावेत, आपले किवळे, आपले विकासनगर आणि गुरूद्वाराचा परिसर खऱ्या अर्थाने सर्वांच्या हितासाठी फुलवू शकतो.
आपली,
सौ. आशा तानाजी (आप्पा) भोंडवे.
उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
प्रभाग क्रमांक 16, मामुर्डी- किवळे- विकासनगर- रावेत- गुरूद्वारा




